📜 परतावा धोरण / अटी व शर्ती

🛍️ जय भवानी इलेक्ट्रिकल्समध्ये ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आहे!
कृपया परतावा व बदल करण्याचे खालील नियम काळजीपूर्वक वाचा:

  • 🔹  बिल आवश्यक आहे: परतावा करताना ग्राहकाजवळ त्या मटेरीअलचे मूळ बिल असणे अनिवार्य आहे.
  • 🔹  पॅकिंग चांगल्या स्थितीत असावे: परत करावयाचे मटेरीअल हे मूळ व सुस्थितीत पॅकिंगमध्ये असावे.
  • 🔹  मोफत मिळालेल्या वस्तूंवर परतावा नाही: कॉम्प्लिमेंटरी स्वरूपात दिलेले मटेरीअल परत घेतले जाणार नाही.
  • 🔹  उघडलेले वायर बंडल / बॉक्स परत स्वीकारले जाणार नाही: फोडलेले वायर बंडल किंवा बॉक्स परत घेतले जाणार नाहीत.
  • 🔹  सुट्या वायर / केबल्सचा परतावा नाही: सुट्या स्वरूपात घेतलेली वायर / केबल परत केली जाऊ शकत नाही. कृपया आवश्यकतेनुसार ऑर्डर करा.
  • 🔹  चार्जिंग बल्ब बॅकअप: चार्गिंग बल्ब च्या बॅकअप संदर्भात कंपनीने क्लेम केलेल्या कालावधी मध्ये आणि वास्तविक कालावधी मध्ये फरक असू शकतो, किंवा कालांतराने कमी होऊ शकतो. बॅकअप कालावधी कमी आहे हि सबब रिप्लेसमेंटला चालणार नाही.
  • 🔹  १० दिवसांच्या आत पिकअप विनंती: बिलाच्या तारखेपासून १० दिवसांत परताव्यासाठी पिकअपची विनंती करणे आवश्यक आहे.
  • 🔹  पिकअप वेळ : विनंतीनंतर २० दिवसांच्या आत पिकअप केला जाईल. ही मुदत स्पॅम ऑर्डर टाळण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

📦 महत्त्वाची सूचना: परतावा व बदल प्रक्रिया केवळ वरील अटींच्या अधीन राहील. अटींचा भंग झाल्यास परतावा स्वीकारला जाणार नाही.

🧾 कृपया प्रत्येक खरेदीवेळी आपले बिल जतन करून ठेवा.

🙏 आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 

WhatsApp_Image_2025-06-05_at_17.18.13-removebg-preview
Arrange Pickup